बुद्धिबळ स्पर्धेत दिशांक बजाजला विजेतेपद

खासदार क्रीडा महोत्सव 2023

बुद्धिबळ

बुधवार, 11 जानेवारी 2023

कविवर्य सुरेश भट सभागृह

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत चौथा मानांकित दिशांत बजाजने विजेतेपद पटकाविले. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या अंतिम फेरीत दिशांक बजाजने संस्कार गायगोरेला, सिद्धांत गवईनने शिवा अय्यरला, वृतिका गेमने हिमांशू जेठवाणीला आणि जय सव्वालाखेने श्रद्धा बजाजला पराभूत केले. त्यामुळे चार बुद्धिबळपटूची गुणसंख्या 8 अशी सारखी झाली. त्यामुळे मुख्य पंच प्रवीण पानतावणे यांना तांत्रिक गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करावा लागला. सर्वाधिक 52.5 तांत्रिक गुणांसह दिशांक बजाज विजेतेपदाचा मानकरी ठरला. सिद्धांत गवई (51) दुसऱ्या, जय सव्वालाखे (49) तिसऱ्या आणि वृतिका गमे (46.5) चौथ्या स्थानी राहिली. अग्रमानांकित प्रदीप तिवारी पाचव्या व आयुष रामटेके सहाव्या स्थानी राहिला.

बक्षीस वितरण समारंभात उपस्थित नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष दिलीप कामदारख कोषाध्यक्ष श्रीनिवास पारखी, स्पर्धेचे मुख्य पंच प्रवीण पानतावणे, सुधीर पुसदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बुद्धिबळ स्पर्धेत चॅम्पियन ठरलेल्या दिशांकला 11 हजार रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आले. तर दुस-या स्थानावरील सिद्धांत गवईला 10 हजार रुपय रोख व चषक आणि तिस-या स्थानावरील जय सव्वालाखेला 9 हजार रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आले. याशिवाय चवथ्या ते दहाव्या स्थानावरील खेळाडू अनुक्रमे वृत्तिका कृष्णा गमे, प्रदीप तिवारी, आयुष रामटेके, शिवा अय्यर, संस्कार गायगोरे, हिमांशू जेठवानी, सतीश परांजपे यांना क्रमश: 8 हजार, 7 हजार, 6 हजार, 5 हजार, 4 हजार, 3 हजार आणि 2 हजार रूपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अंतिम फेरीतील निकाल : (अनुक्रमे एक ते दहा)

दिशांक सचिन बजाज, सिद्धांत गवई, जय सव्वालाखे, वृत्तिका कृष्णा गमे, प्रदीप तिवारी, आयुष रामटेके, शिवा अय्यर, संस्कार गायगोरे, हिमांशू जेठवानी, सतीश परांजपे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बसपाने जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला 

Thu Jan 12 , 2023
नागपूर :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम गुरु मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंती निमित्त शुक्रवारी तलावा शेजारी असलेल्या त्यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व अभिवादन करून आज नागपूर जिल्हा बसपाने त्यांचा जन्मोत्सव साजरा केला. महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या सचिव रंजना ढोरे यांच्या अध्यक्षते खाली आजचा जिजाऊ जन्मोत्सव पार पडला. याप्रसंगी प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com