संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त रनाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून युवा चेतना मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दिवटे , राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता शिर्के , विशेष अतिथी महाराष्ट्र टाईम्स चे वरिष्ठ पत्रकार वैभव गांजापुरे तर प्रमुख पाहुणे कामठी पंचायत समीतिच्या सभापती दिशा चनकापुरे , रनाळाचे सरपंच पंकज साबळे , नेहरू युवा केन्द्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयवीर सिंग, जिल्हा परीषद विरोधी पक्षनेते अनिल निधान , माजी पंचायत समीती सभापती उन्मेष रडके , जीवनतंरग संस्थेचे अध्यक्ष उमेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.
याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच अंकिता तळेकर , गादाचे सरपंच सचिन डांगे , रनाळा ग्रामपंचायतचे सदस्य.अर्चना ठाकरे, मंगला ठाकरे , सुनील चलपे , मयूर गणेर , इंदुताई पाटील ,स्वप्निल फुकटे , सुनिता नंदेश्वर , स्मिता भोयर , अरविंद डोंगरे , आमिर खान , प्रदीप सपाटे, रश्मिता झाडे यांचा सत्कार करण्यात आले . याप्रसंगी स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ,स्व. श्याम तांबोळी यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी रनाळा गावातील सेवानिवृत्त सौनिक शेषराव अढाऊ , महेश ईंगोले ,सिध्दार्थ गणेर यांचा विशेष सत्कार करण्यात आला . याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पँरा एँथलेटिक्स शुभम सिंगनाथ यांना “युवारत्न ” पुरस्काराने तर आंचल बोंबाटे यांना “जिजाऊ” पुरस्काराने तर आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स माजी सौनिक अक्रम खान विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात आले . याप्रसंगी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये ३०रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रंसगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खोपे , प्रास्ताविक प्रा.पराग सपाटे , सत्कारमुर्ती चा परीचय प्रिती हिवरेकर , आभार प्रदर्शन नम्रता अढाऊ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बाँबी महेंद्र , अमोल नागपुरे , मयूर गुरव , अभिलाष नितनवरे, कमलाकर नवले , अनिल गंडाईत , लक्ष्मीकांत अमृतकर ,हितेश बावनकुळे , कामरान हैदरी ,आशिष हिवरेकर , नितीन ठाकरे ,उमेश गिरी , घनश्याम चकोले ,सत्यम यादव , लोकेश यादव , अक्षय गिरी , भुषण ढोमणे, अतुल चोरघडे , रूपेश चकोले, अश्विन ठाकरे, राजेश मौर्या, हिमांशु लोंडेकर , डॉ निखील अग्निहोत्री , गौतम पाटील निखिल पाटील, संगीता आढाऊ , भावना सपाटे ,युवा चेतना मंच चे सदस्य तसेच नेहरू युवा केन्द्र आदीनी सहकार्य केले.