नागपुर – दुबईहून नागपुरात आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यामुळं नागपूर जिल्ह्यात 13 नव्या रुग्णांची भर पडली. गेल्या 12 दिवसांनंतर कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येचा आकडा हा दुहेरी झाला. त्यामुळं कोरोनाचा धोका नागपुरात वाढला आहे.
नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविले आहे . दुबईतून नागपुरात आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं त्यांना एम्समध्ये स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. 40 व 29 वर्षांच्या दोन महिला तसेच 29 वर्षांचा पुरुष व 11 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. फक्त एकाच पुरुषाला लक्षणे आहेत. इतर तिघांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. या प्रवाशांना ओमिक्रॉनचे संशयित म्हणून पाहिले जात आहे.