संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी मकरसंक्रांत सनाच्या पाश्वरभुमीवर पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरने हा घातक असल्याची माहिती असूनही प्रतिबंधित नायलॉन मांजाची चोरी छुपे उपयोग वा वापर केल्यामुळे अनेक भागात नायलॉन वा चायनीज मांजा मध्ये अडकून अनेक मानवी जीवितास वा पक्ष्याचा घात होत असल्याचे अनेक उदाहरणे दृष्टीक्षेपास येतात .
आगामी येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर ट्युशनला सायकल वा मोपेडचा वापर करून रस्त्यावर आवागमन करताना तसेच नोकरीवर किंवा इतर तत्सम कामासाठी घरून मोटर सायकलवर निघालेल्या चालकाचे गळ्यात मांजा अडकल्यामुळे त्याची गळ्याची नस कपून त्यांना आपला जीव गमवावा लगल्याची शक्यता नाकारता येत नाही .अशा स्वरूपाच्या मानवी व प्राणी जीवितास धोकादायक ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन /चायनीज मांजा खरेदी व विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कारवाही करण्यात येणार आहे.तेव्हा खबरदार ,नायलॉन मांजा विकाल वा वापराल तर थेट गुन्हेच नोंदविणार असल्याचा इशारा जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर यांनी दिला आहे.
नागरिकानी आपले पाल्य तथा शालेय/महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून ‘मी पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’अशा प्रकारची प्रतीज्ञा घेऊन पालकांनी आपला पाल्य पतंग उडवताना कोणता मांजा वापरतो आहे याकडे लक्ष ठेवावे तसेच त्याच्याकडे नायलॉन मांजा खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास त्यानी तात्काळ पोलीस स्टेशन ला संपर्क साधून माहिती देऊन जनहितार्थ जवाबदारी पार पाडावी असे आवाहन सुद्धा पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.