नागपूर :-भरधाव जाणार्या रेल्वेने एका इसमाला धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवार 9 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास बुटीबोरी रेल्वे स्थानकाच्या होम सिग्नल जवळ (ऑफ लाईनवर) घडली.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नागपूरककडून बल्लारशाह दिशेने जाणार्या रेल्वेने एका इसमाला धडक दिली. बर्याच दुर पर्यंत त्याला फरफटत नेले. त्याच्या शरीराचे अनेक तुकडे झाले. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रवाना केले. मृताच्या अंगात हिरव्या रंगाची टी शर्ट आणि क्रिम रंगाची स्वेटर आहे. मृताची अद्याप ओळख पटली नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून पुढील तपास एएसआय विजय मरापे करीत आहेत.
@ फाईल फोटो