नागपूर : पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या पद्व्युत्तर वसतिगृह परिसरात केले असून या महोत्सवात 200 स्टॉलचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या मध्ये शेतकऱ्यांनी स्वयंनिर्मित तांदळाचे 100 स्टॉल लावले आहेत. त्यासोबतच ज्वारी, संत्रा, तूर दाळ, गहू, तीळ, मसाले भाजीपाला, फळे आकर्षक पॅकींगध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठया संख्येने एकदा भेट दयावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी केले आहे.कृषी विद्यापीठ कृषि विज्ञान केंद्र, सीसीआरआय, सी. आय. सी. आर.- 5, कृषी तंत्रज्ञान दालने 25 शासकीय विभागांची दालने 20, धान्य फळे भाजीपाला विक्री दालने-60, गृहपयोगी वस्तु विक्री दालने 30, खाद्यपदार्थ दालने 10, सेंद्रीय शेतमाल दालन- 20, खासगी, सार्वजनिक निविष्ठा उत्पादकांचे दालनआदी स्टॉल लावण्यात आले आहे. या दालनामध्ये प्रात्यक्षिके, कृषी विज्ञानपीठे, कृषी व कृषी संलग्न, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी महामंडळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ भारत संचार निगम लिमिटेड., जिल्हा परिषद, संशोधन संस्था, शासकीय यंत्रणाबरोबरच खाजगी कंपन्या, उद्योगक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदीचा स्टॉलचा समावेश असून परिसंवादाचे आयोजन केले आहे. शेतकरी बांधवांना सुध्दा आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यास मदत होणार आहे.
या महोत्सवात प्रामुख्याने 1 हजार क्विंटल तांदूळ आणि इतर शेतमाल जसे हरभरा, डाळ, ज्वारी, तीळ, उडीद, वाटाणा, गुळ, हळद, मिरची पावडर, मसाले व भाजीपाला आदी शेतकऱ्यांनी पिकविलेला माल विक्रीसाठी उपलब्ध आहे
सेंद्रिय शेती अंतर्गत उत्पादित सर्व शेतमाल नागपूर आरगनिक गोडयूस सिस्टीम (NOEPS) या ब्रँडखाली विक्रीकरीता उपलब्ध आहे. आत्मा अंतर्गत पार्वती या सुगंधीत वाणाचे सेंद्रिय पध्दतीने उत्पादन करण्यात आलेले असून मागील वर्षी महोत्सवात भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी यावर्षी या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद देवून या महोत्सवात विक्रीकरीता उपलब्ध शेतमालाची जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करावी व महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी हातभार लावावा, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.