नागपूर : जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत School Based Pit & Fissure Project (स्कुल बेस्ड पीट आणि फिसर प्रोजेक्ट)चा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये School Based Pit & Fissure Application (स्कुल बेस्ड पीट आणि फिसर अप्लीकेशन)ची गरज असलेल्या मुलांकरिता राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत स्कुल बेस्ड पीट आणि फिसर प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गरजु मुलांना Sealant Application करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात आज शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर येथे करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. यावेळी शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.दातारकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ.रितेश कळस्कर, डॉ.दानिश इकबाल, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी व NCD चमु आदी उपस्थित होते.
या प्रकल्पाअंतर्गत यावर्षी एकूण 19 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 2414 विद्यार्थ्यांची दंत शल्य चिकित्सकांद्वारे तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी 615 Sealant Application करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद व शासकीय दंत महाविद्यालय यांचेमध्ये सदर तपासणी व उपचाराकरिता करार करण्यात आलेला आहे.