नागपूर, दि.27 : माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतीयाळे, सहायक संचालक संघमित्रा ढोके, तहसिलदार अरविंद सेलोकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.