वाडी(प्र):- लोकशाहीला अधिक बळकट करण्याकरिता व दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वाडी नगर परिषद कार्यालया तर्फे एका विशेष मोहिमे अंतर्गत मतदार नोंदणी कार्यक्रम राबविन्यात आला होता,त्यात दिव्यांग बांधवांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
दिव्यांग मतदाराने लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा याकरिता दिव्यांग मतदार विशेष नोंदणीं मोहीम नगरपरिषद कार्यालय वाडी येथे सुरू असताना परिसरातील सर्व दिव्यांग बांधवांनी स्थानिक नगरपरिषद वाडीच्या कार्यलयात आपल्या स्थानिक निवासाबाबत कुठलेही दोन रहिवासी पुरावे, आधारकार्ड,दिव्यांग प्रमाणपत्र इ.प्रतिलिपी सह अर्ज भरून घेण्यात आले.यावेळी हिंगणा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, नायब तहसिलदार थोरवे ,उपमुख्याधिकारी रत्नमाला फटींग,योगेश जहागीरदार,तलाठी किशोर शिवणकर इ. प्रामुख्याने उपस्थित होते.या विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी वाडी नप.तर्फे पेंडॉल मध्ये बसण्याची व इतर आवश्यक सुविधा देण्यात आली होती.मोहीम यशस्वी करण्यासाठी रमेश कोकाटे,धनंजय गोतमारे,भीमराव जासुतकर,भारत ढोके,पिंकेश चकोले,इ.ची उपस्थिती होती.