समस्त हिंदू समाज व संघटनांचा बैठकीद्वारे निर्धार !
नागपूर :- येथील अखिल भारतीय माहेश्वरी समाज भवन येथे हिंदू जनजागृती समिती तर्फे आयोजित समस्त हिंदूत्वनिष्ठ संघटना व विविध समाज संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या २१ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर विशाल मोर्चाद्वारे कठोर “लव जिहाद विरोधी कायदा” व “धर्मांतर बंदी कायदा” लागू करावा यासाठी शासनावर दबाव निर्माण करून दोन्ही कायदे संमत करण्यात यावे ही मागणी करण्यात येणार आहे. या बैठकीला आनंद घारे सचिव ( अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ), निमजे समन्वयक (शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), रहल पांडे अध्यक्ष ( राष्ट्रीय युवा गठबंधन), राकेश बत्रा (पूज्य शदानीदरबार, नागपूर), सुशील चौरासिया व शिवाजी राउत (विश्व हिंदू परिषद), वैशाली परांजपे (हिंदू विधिज्ञ परिषद), कीर्तनकार भीमराव भुरे आदी मान्यवर उपस्थित होते. दर वर्षी १५ लक्ष हून अधिक हिंदूंचे धर्मांतरण होत आहे. दक्षिण भारतात ५०० हून अधिक गावे धर्मांतरित झाली असून आता वेगळ्या राज्याची मागणी होत आहे. मागील २५ वर्षात जेवढे धर्मांतरणाचे कार्य झाले नाही तेवढे कोरोन काळात झाले असे अन्फोल्डींग वर्ल्ड या संस्थेचा अध्यक्ष डेविड रीब्ज याने सांगितले. हे असेच सुरु राहिले तर देशाची पुन्हा फाळणी दूर नाही त्यामुळे धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करणे आवश्यक आहे.
लव जिहादच्या माध्यमातून लक्षावधी हिंदू मुलींचे शोषण, धर्मांतरण, हत्या होत आहे. महाराष्ट्रातून लक्षावधी मुली बेपत्ता झाल्या आहेत. या विरोधात तक्रार नोंदही केल्या जात नाही, आमच्या माता बहिणीच्या सुरक्षेसाठी या विरोधात एकही सक्षम कायदा नसल्याने धर्मान्धांचे फावत आहे. यासाठी अन्य ९ राज्यांप्रमाणे कठोर “लव जिहाद विरोधी कायदा” महाराष्ट्रातही लागू करण्यात यावा अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना मिळून करणार आहोत अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे श्रीकांत पिसोळकर यांनी दिली.
१२ ते १८ डिसेंबर दरम्यान या मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन घेण्यात येणार आहेत. हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या मोर्चाचे आयोजन केले असून यात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे केले जात आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी ९३७३५३६३७० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.