नागपूर :-राष्ट्रीय अध्यक्ष,पक्षाचे आधारस्तंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक रविवार ११/१२/२०२२ रोजी राष्ट्रवादी डॉक्टर सेल, नागपूर शहर व अर्बन सेल नागपूर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने “रक्तदान शिबिराचे” आयोजन सर्वेश्वर हनुमान मंदिर समोर, रेशीमबाग नागपूर येथे करण्यात आले होते
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शहर अध्यक्ष दुनेश्वरभाऊ पेठे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, जानबा मस्के, महिला अध्यक्षा लक्ष्मी सावरकर, श्रीकांत घोगरे, अशोक काटले, सुखदे वंजारी, रवी पराते, झिलपे, त्याचप्रमाणे डॉ. अजय भोजवानी व सर्व डॅाक्टर टिम तसेच नाभिक एकता मंचचे विवेक तळखंडे व मोठ्या संखेने उपस्थित प्रयास पॅानलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्बन सेल नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी केले तसेच राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर नितीन कान्होलकर यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व रक्तदात्यांचे आभार मानले.
आयुष ब्लड बँक तर्फे राहुल भोयर व टिम यांनी रक्तदान शिबिरासाठी महत्त्वाची भूमिका वठवली. या वेळेस पक्षातर्फे रक्तदान करणार्यांना प्रमियर टिफिन बॅाक्स व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अशाप्रकारे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले.