मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अशोक खरटमल, आनंद साबळे, अंबादास केदारे, सुरेश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.