संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ग्रामीण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जिवाची पर्वा न करता निस्वार्थ पणे देशाची सेवा करीत देशाचे संरक्षण केले आहे त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व माजी सैनिकांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सम्मान देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने नुकतेच घेतलेल्या निर्णयातून बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना अंतर्गत 9 सप्टेंबर 2020 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातून राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून माफि देण्याचे आदेशीत केले आहे तेव्हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या कामठी शहरातील माजी सैनिकांनी कामठी नगर परीषद च्या हद्दीतील मालमता करमाफी करून घेत शासनाच्या निर्णयाचा लाभ घ्यावा असे आव्हान कामठी नगर परीषदचे कर्मचाारी प्रदीप भोकरे यांनी केले आहे.