नागपूर: महा मेट्रोच्या अँक्वा लाईन मार्गिकेवर १ ते १० डिसेंबर दरम्यान मेट्रो सेवा लोकमान्य नगर स्टेशन ते झाशी राणी चौक स्टेशन पर्यंत होती. पण ठरलेल्या वेळेच्या आधीच कार्य पूर्ण झाल्याने आता ही सेवा येत्या ७ डिसेंबर (मंगळवार) पासून पूर्ववत होत आहे. महा मेट्रोच्या रिच-४ अंतर्गत असलेल्या सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान कमिशनिंग कार्य होऊ घातलेल्या कार्यामुळे ही सेवा झाशी राणी चौक स्थानकापर्यंत होती.
पण महा मेट्रोने रिच-४ मधील कमिशनिंग संबंधित कार्य वेगाने केले. नेहमी प्रमाणे आपल्या कामाची गती कायम ठेवत महा मेट्रोने हे कार्य ठरलेल्या वेळेच्या आधी पूर्ण करीत असून अवघ्या काही दिवसातच ही सेवा सीताबर्डी इंटरचेंज स्थानकापर्यंत पूर्ववत होते आहे. सदर मार्गिकेवरील कार्य पूर्ण होत असल्याने ७ डिसेंबर (मंगळवार) पासून लोकमान्य नगर ते सिताबर्डी इंटरचेंज दरम्यान प्रवासी सेवा पूर्ववत होत असल्याची नोंद प्रवाश्यानी घ्यावी.
या दरम्यान, प्रवाश्यांच्या सोई करिता महा मेट्रो तर्फे निशुल्क फिडर बस सेवेची व्यवस्था केली आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन दरम्यान ही सेवा असून याचा मोठ्या प्रमाणात फायदा प्रवासी घेत आहेत. एक्वा मार्गीकेवरून ऑरेंज मार्गिकेवर किवा ऑरेंज मार्गीकेवरून एक्वा मार्गिकेवर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवासी या फिडर बस सेवेचा लाभ घेत आहेत.