बांधकाम साहित्य रस्त्यावर, १३ हजारांचा दंड

चंद्रपूर १७ नोव्हेंबर :- चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या नागरीकांना १३ हजारांचा दंड तर विनापरवानगी बोरींग खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरीकांना ४००० रुपयांचा दंड करण्यात आला.

घर,इमारत किंवा इतर काही बांधकामास वाळु, विटा, खडी,लोखंड,गिट्टी, मुरूम याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. काही मालमत्ताधारक बांधकामादरम्यान सदर साहीत्य बाहेर ठेवतात. नियमानुसार बांधकाम साहीत्य उघड्यावर ठेवता येत नाही. मालमत्ताधारकाने खाजगी मालमत्तेवर आवारभिंत उभारून त्यामध्ये साहित्य ठेवणे अपेक्षीत आहे.

रस्त्यावर पडलेली रेती, गिट्टीमुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडु शकतात. रस्ता जर अरुंद असेल तर रस्त्यावरील सामानामुळे पूर्णत: बंद होतो. वाहनधारक व पायी जाणाऱ्या नागरिकांना देखील या साहीत्यांचा अडथळा होतो. वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतुक कोंडी होऊ शकते त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्या ५ तर विनापरवानगी बोरींग खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ नागरिकांवर दंड ठोठावण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची सूची ठरवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीला प्रादेशिक गरजेनुसार बदल करण्यास मंजुरी दिली

Thu Nov 17 , 2022
सुधारित पदार्थसूचीमुळे प्रादेशिक स्तरावरील मागण्या पूर्ण होतील. प्रीपेड प्रकारच्या गाड्यांच्या तिकिटांमध्ये प्रवास शुल्कासोबत खानपान सेवेचे शुल्क देखील समाविष्ट असते, अशा वेळी आधी सूचित केलेल्या शुल्कामध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ आयआरसीटीसी निश्चित करेल. इतर मेल किंवा एक्प्रेस गाड्यांमध्ये आधी सूचित केलेल्या ठराविक शुल्कामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमाणित जेवण थाळीसारख्या मर्यादित खर्चाच्या पदार्थसूचीची निवड आयआरसीटीसीद्वारे केली जाईल जनता गाड्यांमधील जेवणाची पदार्थसूची आणि शुल्क यांच्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com