तिरोडयात ओबीसी बांधव सह हजारो लोकांनी २२ प्रतिज्ञा सह बौद्ध धर्म स्वीकारला

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नुकतेच द बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) धम्म परिषदेत मार्गदर्शक राजरत्न आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष यांनी २२ प्रतिज्ञा शपथविधी देऊन या कार्यक्रमात ओबीसी बांधव सहीत हजारो लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे.हा कार्यक्रम तिरोडा येथील अटल बिहारी वाजपेयी सभागृह पार पडला.

द बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे आयोजित कार्यक्रमात धम्मरैली युनीयन बैक चौक पासुन ते अटल बिहारी सभागृह पर्यंत काढण्यात आली या रैलीमध्ये गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो सह डीजे सह रैलीत राजरत्न आंबेडकर सह भारतीय बौद्ध महासभा सभेचे पदाधिकारी सह हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका सह लहान मुले पांढरा शुभ्र वस्त्र घालुन हातात पंचशील ध्वज सह मोटारसायकल चारचाकी वाहनासह रैली काढण्यात आली होती.

या कार्यक्रमाला राजरत्न आंबेडकर सह शशीकांत जाधव‌ कोषाध्यक्ष ,विजय बन्सोड विभागीय अध्यक्ष , महेन्द्र मेश्राम जिल्हाअध्यक्ष , कार्यक्रम संयोजक देवानंद शहारे तालुका अध्यक्ष, सह संयोजक प्रा. राजविलास बोरकर सचिव सह भारतीय बौद्ध महासभा तालुका तिरोड्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो दिपप्रज्वलन व फोटो माल्यापण करुन करण्यात आली. शिक्षण, हक्क, कायदा सहकार क्षेत्र अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन राजरत्न आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष यांनी करुन कार्यक्रमात उपस्थित असल्यांना २२ प्रतिज्ञाची शपथविधी देऊन बौद्ध धर्म दिक्षा दिली यावेळी ओबीसी बांधव यांनी देखील बौद्ध धर्म दिक्षा घेतली. कार्यक्रमाचे संचालन उके सर तर आभार राजविलास बोरकर यांनी मानले कार्यक्रमाला हजारो जनसंख्येने बौध्द उपासक उपासिका उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम , इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्यासमवेत राज्य शासनाचा करार

Mon Nov 14 , 2022
मुंबई, दि. 14 : राज्य शासनाच्या विद्यार्थी समग्र विकास धोरणांतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) सोबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सामंजस्य करार केला आहे. शासकीय शाळांमधून बालकांच्या आरोग्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा करारात समावेश आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत रामटेक या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!