दिनेश दमाहे ,मुख्य संपादक
स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण च्या पथकाला मोठा यश..
नागपूर – स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांना मुखबिरव्दारे खात्रीशिर माहिती मिळाली की पांढुर्णा येथे राहणारा चरणसिंग भादा नावाच्या इसम व त्याचे इतर साथीदारांसोबत मिळुन नागपुर ग्रामीण जिल्हयात अनेक घरफोडी केलेल्या आहे. प्राप्त खबरेची शहानिशा करून अधिक माहिती मिळविली असता चरणसिंग भादा रा पांढुर्णा म.प्र. यांने आपले साथीदारा सह मिळुन चोरी केल्याचे निश्पन्न झाल्याने पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण याचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मध्य प्रदेश पांढुर्णा येथे पाठवुन माहीती गोळा करून चरणसिंग भादा रा पांढुर्णा म.प्र. याला मोठया शिताफीने त्याचे राहते गाव अंबाडा खुर्द म.प्र येथुन ताब्यात घेवुन नागपुर ग्रामीण जिल्यात झालेल्या घरफोडीचे गुन्हया संबधात सखोल विचारपुर केली असता आरोपीने प्रथम पोलीसांना उडवाउडवीचे उत्तरे दिले नतंर पोलीसांनी पोलीसी हिसका दाखवताच आरोपी पोपटा सारखा बोलुन त्याचे साथीदार 1) संगमसिंग जगदिशसिंग बावरी, वय 35 वर्ष, रा. शास्त्री वार्ड पांढुर्णा 2) कुंदनसिंग कालूसिंग जुणी, वय 22 वर्ष, रा. शास्त्री वार्ड, पांढुर्णा आणि 3) मुकेश बद्देवार वय 35 वर्ष, रा. थुनिया, छिंदवाडा यांचेसोबत मिळून नागपुर ग्रामीण जिल्हयातील पो.स्टे. बेला, भिवापूर, उमरेड, कन्हान, खापरखेडा, कळमेश्वर , केळवद, पारशिवनी,कोढांळी या परिसरात घरफोडी आणि चोरी केली असून या गुन्हयांमध्ये त्यांनी शेवरलेट कंपनी ची कार क्र. MH-14-B-2400 चा उपयोग केल्याचे सांगीतले आहे. तसेच पो.स्टे कळमेश्वर,केळवद हददीतील गुन्हयाचे दरम्यान आम्ही मोटार सायकलचा वापर केला असल्याचे सांगीतले आरोपीचे ताब्यातुन शोस्म मधुन चोरलेले कपडे अं. किंमती 10,000 रु. चिल्लर रक्कम किंमती 4100/- रु. आणि शेवरलेट कंपनी ची कार क्र. MH-14-B-2400 अं. किंमती 3,00,000 रु. असा एकुण 3,14,100/- रुपयाचा मुद्देमाल तसेच आरोपीने घरफोडीचे गुन्हयातील सोने तिवसा जि.अमरावती येथील दत्तकुपा ज्वेलर्स या व्यावसायीेकाला विकल्याचे सांगीतल्याने सराफा व्यावसायीक ज्ञानेश्वर शंकरराव पाचकवडे यांच पासुन सोण्याची लगड 1600 ग्राम वजनाची अंदाजे बाजारभाव प्रमाणे 75000/- कीमती जप्त करण्यात आली सदर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी व सराफा व्यावसायीक ज्ञानेश्वर शाकरराव पाचकवडे तिवसा जि.अमरावती येथील दत्तकुपा ज्वेलर्स यांचे पासुन एकुण 3,89,100/- रू .चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
उघडकीस आलेले गुन्हे
1) पोस्टे भिवापुर अप.क्र 154/2022 कलम 457, 380 भादवि 2) पो.स्टे.बेला 131/2022 कलम 457, 380 भादवि 3) पो.स्टे. उमरेड अप.क्र 615/2022 कलम 457, 380 भादवि 4) पो.स्टे.कळमेश्वर अप.क्र अप.क्र 708/2022 कलम 457, 380,511,34 भादवि 5) पो.स्टे.खापरखेडा अप क्र 592/2022 कलम 457, 380 भादवि , अप.क्र 377/2021 कलम 454, 457, 380 भादवि 6) पो.स्टे.कन्हान अप क्र 594/2022 कलम 457,380 भादवी 7) पो.स्टे.केळवद अप क्र 188/2022 कलम 454, 457, 380 भादवि 8) पो.स्टे.पारशिवनी अप क्र 168/2021 कलम 454, 457, 380 भादवि 9) पो.स्टे.कोढांळी अप.क्र. 156/2021 कलम 454, 457, 380 भादवि 10) पो.स्टे.सावनेर 622/2021 कलम 454, 457, 380 भादवि असे एकुण 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असुन फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर,अपर पोलीस अधिक्षक राहुल माकनीकर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात पोउपनि भारत थिटे पोहवा राजेद्र सनोडीया,मदन आसतकर,अरविंद भगत,नरेद्र पटले पोलीस नायक शैलेश यादव,बालाजी साखरे,अजिज दुधकनोज महीला पोलीस अमंलदार स्वाती हिडोरीया चालक आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली..