स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.20) ०७ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, नेहरूनगर,गांधीबाग आणि सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात ०६ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३०,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच १३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १५, रामदासपेठ येथील गणेश भोजनालय या उपहारगृह विरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.नेहरूनगर झोन अंतर्गत सक्करदरा चौक येथील गुरुकृपा स्वस्त कपडा भंडार या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच गांधीबाग झोन अंतर्गत महाल गांधीगेट येथील येथील रजा अगरबत्ती, खुशबू अगरबत्ती आणि के जी एन अगरबत्ती या दुकानांविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत इतवारी, नेहरू पुतळा येथील राहुल जनरल स्टोर्स या दुकाना विरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत वर्धा रोड स्थित राम स्वर मेडस्पेस सेंटर यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.स्टिक विरुध्द मनपाची

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिवाळीच्या आधी भाऊबीज निधी न दिल्यास २६ तारखेला संविधान चौकात मंत्र्यांची ओवाळणी करणार - साठे

Fri Oct 21 , 2022
नागपूर :- आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू ) नागपूर जिल्हा कमिटीची विस्तारित बैठक रवी भवन सभागृहात पार पडली. बैठकीमध्ये सर्वांनुमते आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी आधी भाऊबीज निधी न मिळाल्यास 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी नागपूरच्या संविधान चौकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री -एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस व नागपूरचे वजनदार मंत्री-चंद्रशेखर बावनकुळे यांची हजारो आशा वर्कर व गटप्रवर्तक ओवाळणी करणार असा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!