कोळसा खदान जि प शाळे जवळुन दगडी कोळसा व मारूती सुजुकी चोरी.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर तीन जिल्हा परिषद शाळे जवळुन दोन आरोपींनी दगडी कोळसा व मारूती सुजुकी सह एकुण ६७,४४० रु. मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१०) ऑक्टों बर ला वेकोलि सुरक्षा रक्षक दुपारी सेकंड शिफ्ट ४ ते १२ वाजता सेराजुद्दीन मोहम्मदीन अंसारी वय २५ वर्ष खदान नं.३ कन्हान हे पेट्रोलिंग ड्युटी करीत असतांना १) नाहीदबाबु सैय्यद वय २७ वर्ष राह.वार्ड क्र. ४ शिव नगर कांद्री कन्हान, २) सोहेल अब्दुल खान वय २१ वर्ष राह. खदान नं.३ कन्हान यांनी संगमत करून एम एच ४०/ सी.डी – ३४३९ क्रमांकाच्या बोलोरो गाडी मधील दगडी कोळसा मारूती सुजुकी ८०० गाडी क्र. एम एच ०६/ ए बी ३२२६ या मध्ये ९३० किलो दगडी कोळसा किंमत ७४४० रू. व मारूती सुजुकी किंमत ६०,००० रू असा एकुण ६७,४४० रूपयांचा मुद्देमाल दोन आरोपींनी चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोलि सुरक्षा रक्षक सेराजुद्दीन मोहम्मद्दीन अंसारी यांचा तक्रारीने पोस्टे कन्हान ला आरोपी १) नाहीद बाबु सैय्यद, २) सोहेल अब्दुल खान यांचा विरुद्ध अप क्र ५९०/२२ कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जयलाल सहारे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा.

Fri Oct 14 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कन्हान : – शहर विकास मंच द्वारे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसा निमित्य आंबेडकर चौक कन्हान येथे प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रकाश कुर्वे, कोषा ध्यक्ष प्रणय बावनकुळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिवसा निमित्य उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उप स्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!