संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहना सह एकुण ४०,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शा खा नागपुर ग्रामिणचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीसांनी लुटमार व चोरीचे दोन आरोपी पकडुन त्या च्या जवळुन एक मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचा की वाहना सह एकुण चाळीस हजार रूपयाचा मुद्दे माल जप्त करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन केले.
कन्हान परिसरात व नागपुर ग्रामिण जिल्हयात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लुटमार व चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागपुर ग्रामिण पोलीस अधि क्षक मा. विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा ना.ग्रा.चे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने पो नि ओमप्रकाश कोकाटे यांनी ही बाब अत्यंत गांभिर्या ने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्म चारी यांना आदेशित करून पथके तयार केली. प्राप्त माहिती नुसार पोस्टे कन्हान ला अप. क्र ४८०/२२ कलम ३९२, ३४ भादंवि आणि अप.क्र ५४५/२२ कल म ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल असल्याने आरोपीचा शोध कामी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणचे पथक (दि.६) ऑक्टोंबर रोजी कन्हान उप विभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त माहीत दारा कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, आरोपी नामे १) पंकज चंद्रभान सतापे, २) सादिक सलीम शेख दोन्ही राह. खदान नंबर ३ यांनी लुटमार व चोरी च्या घटनेला अंजाम दिला आहे. अशा प्राप्त खबरेची पळताळणी पोलीसांनी केली असता पोलीसांनी आरोपी नामे १) पंकज चंद्रभान सतापे, २) सादिक सलीम शेख यांना पकडुन त्याच्या जवळुन एक मोबाइल व गुन्ह्यात वाप रलेली दुचाकी वाहना सह एकुण ४०,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन केले.
सदर कारवाई नागपुर ग्रामिण पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माखनिकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या आदेशा नुसार, सपोनि अनिल राऊत, पोहवा विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, अरविंद भगत, पोना शैलेश यादव, प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड, सतीश राठोड, मुकेश शुक्ला सह आदी पोलीस कर्मचा-यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.