संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 66 वा दिन तसेच नवरात्र व दशहरा निमित्त सदभावना ग्रुप कामठी च्या वतीने कामठी बस स्टँड चौकात भव्य भोजनदानाच्या आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून हजारोच्या संख्येतील अनुयायांनी या भव्य भोजनदानाचा आस्वाद घेतला.
या भोजनदान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदभावना ग्रुप कामठी चे प्रमोद खोब्रागडे, राकेश कनोजिया, सुनिल बडोले, हरीश गुल्हाने, मुकेश मेश्राम, मुकेश कनोजिया, प्रमोद रंगारी, अँड.पंकज यादव, प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर ,नरेश फुलझेले, अजय करिहार, सज्जाक भाई शेख, आशीष मेश्राम, आसाराम हलमारे, सलीम भाई, नागसेन गजभिये, प्रा. फिरोज हैदरी, सुनील चहाँदे, अविनाश भांगे, यासीन भाई रजा, महेन्द्र कापसे, धीरज गजभिये, अमित चव्हाण, सपन खांडेकर, सुशील तायडे, मौलाना भाई, रिंकू चाचेरे, मुमताज हैदरी, आदींनी मोलाची भूमिका साकारली.