भारत मुक्ती मोर्चाचा संघ मुख्यालयावर निघनाऱ्या मोर्च्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना कामठीतुन घेतले ताब्यात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

कामठी :- आज 6 ऑक्टोबर ला नागपूरमधील संघ मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नियोजित होते त्यानुसार या मोर्च्यांत सहभागी होण्यासाठी कामठी शहरातील भारत मुक्ती मोर्च्यांचे जवळपास 5 हजार कार्यकर्ते सहभागी होणार होते. त्यानुसार भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कामठीमार्गे नागपूर कडे रवाना होत होते मात्र या मोर्च्यांला परवानगी नसल्याचे कारण दर्शवून नजर ठेवून असलेल्या कामठी पोलिसांनी भारत मुक्ती मोर्च्यांचे 50 च्या जवळपास समस्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते .

संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाने आज नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले होते. त्यात कामठी शहरातूनही मोठया संख्येतील कार्यकर्ते सहभागी होण्यास निघाले होते मात्र पोलिसांनी नागपूर मध्ये या मोर्चाला पुढे जाऊ दिले नाही.तर नवीन कामठी पोलिसांनी कामठी तुन जाणाऱ्या या कार्यकर्त्यांना वेठीस धरून मोर्च्यांत सहभागो होण्यास मज्जाव करीत पोलीस स्टेशन ला बसवून नजरकैदेत ठेवले.पोलिसांनी रोखल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या दरम्यान कार्यकर्त्यानी आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com