धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून चैत्यभूमी येथे अभिवादन 

मुंबई :- 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दादर येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमीला भेट देवून अभिवादन केले.

यावेळी पुज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, व्यवस्थापक प्रदिप कांबळे आदी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलतांना दीपक केसरकर म्हणाले की, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्यभरातील अनुयायी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे जात असतात. काही अनुयायी अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमी येथे येतात. दीक्षाभूमी, चैत्यभूमी हे अनुयायींचे श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी अनुयायींना आवश्यक सर्व सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. अनुयायींना सोयी-सुविधा देण्यासंदर्भात पूर्व तयारी करण्याची गरज असते. त्यासाठी विविध संघटनांशी चर्चा करुन पालकमंत्री या नात्याने कार्यक्रमांची पूर्व तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने नागरिकांच्या श्रद्धास्थानांचा विकास करण्याचे काम केले जात असल्याचे माहिती पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून तसेच बुद्धवंदना म्हणून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या हस्ते भिक्कू संघाला फळदान करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई उपनगर जिल्ह्यात 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमास एन वॉर्ड मधून उद्यापासून सुरुवात : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

Thu Oct 6 , 2022
मुंबई :- मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी-सूचना जाणून घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमाची उद्या, गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ‘एन वॉर्ड’ मधून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!