3 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिन..

नागपूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे दुपारी 1 ते 2 या वेळेत करण्यात येणार आहे.

लोकशाही दिनाकरीता नागरिकांकडून 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार व निवेदन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तक्रार अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना व्यक्तीश: लोकशाही दिनात सहभागी व्हावे लागेल.

तक्रार अर्ज व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे आसावे. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर एक महिन्यात कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करावा. तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.

नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांचे मार्फत आयुक्त नागपूर महानगरपालिका व सभापती नागपूर सुधार प्रन्यास यांचे अध्यक्षतेखाली स्वतंत्र्यपणे लोकशाही दिनाचे आयोजन त्यांचे कार्यालयात करण्यात येत असल्यामुळे सदर कार्यालयाशी संबंधित तक्रारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात दाखल न करता संबंधित कार्यालयात आयोजित होत असलेल्या लोकशाही दिनात सादर करण्यात याव्यात.

लोकशाही दिनाच्या तक्रारीचे निकष याप्रमाणे आहेत. अर्ज विहित नमुन्यात असावा. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, नोकरीविषयक, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल व कार्यालय प्रमुखांनी अंतिम उत्तरे दिलेले प्रकरणे असेल अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्वच्छ भारत दिवसानिमित्त बाईक रॅली रविवारी

Sat Oct 1 , 2022
नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत दिवसाच्या औचित्याने रविवारी २ ऑक्टोबर रोजी बाईक रॅली काढण्यात येणार आहे. स्वच्छ आणि सुंदर नागपूरसाठी प्रत्येकाने स्वच्छतेप्रति जागरूक होण्याचा संदेश देत ही रॅली नागपूर शहरातून निघेल. स्वच्छता रॅलीमध्ये शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. रविवारी २ ऑक्टोबर रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com