अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदियातीलप्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह इंटरनँशनल शाळेतील धक्कादायक प्रकार
गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होई पर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली आहे. तर या घटनेमुळे संतप्त पालकांनी आपला रोष शाळा व्यवस्थापनावर व्यक्त करीत. सदर शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे, तसेच पोलिसात देखील तक्रार केली आहे.
आरटीईच्या नियमातंर्गत देवरी तालुक्यातील मुरपर या गावातली सौरभ रामेश्वर उईके हा गोंदिया प्रेगेसिव्ह इंटरनँशनल शाळेत शिकत असून शाळेच्या सकाळच्या शारीरिक सराव सूरू असताना या शाळेतील शिक्षकाने शुल्लक कारणावरून सौरम या आदिवासी विद्यर्थाला काठी आणि प्लास्टिकच्या पाईप ने बेशुद्ध होयीपर्यत बेदम मारहाण केली. याची माहिती त्याच्या वडिलांना होताच त्यांनी शाळेत धाव घेत सौरभ ला गावी घेऊन आले व विचार पूस केली असता सौरभ ने आपल्या मारहाण केली असल्याचे घरच्यांना सांगितले. याची तक्रार त्यांनी देवरी येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना केली मात्र काही दिवस झाले तरी काही कार्यवाही न झाल्याने त्यांनी सरळ धाव पोलीस ठाण्यात घेतली व त्या शिक्षकानं विरोधात व शाळा व्यवस्थापना विरुद्ध पोलीस तक्रार केली आहे.
– या मारहाणी प्रकरण मुळे शिक्षकांच्या भीतीपोटी सौरभ हा खूब घाबरला असल्याने तो आता शाळेत जाणार नसल्याचे देखील बोलत आहे.