आता शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्री माई फुलें राज्य शिक्षक पुरस्कार असे नाव..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीवकाम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. परंतु सदर पुरस्काराला आज पर्यंत कोणतेही नाव नव्हते डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने मागील पाच वर्षा पासुन राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणा-या शिक्षक पुरस्काराला देशात बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे या साठी आपले आयुष्य पणाला लाव णाऱ्या फुले दाम्पत्याचे नाव देऊन त्यांच्या महान कार्याचा गौरव करावा. या साठी शासन दरबारी लढा दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना वारंवार निवेदने दिली. प्रत्यक्ष भेटीत इतर पुरस्कारांना कोणाचे न कोणाचे नाव आहे उदा. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, छत्रपती शिवाजी पुरस्कार आदी बाबी शासनाच्या लक्षात आणु न दिल्या व सदरील राज्य शिक्षक पुरस्काराला क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव देणेच योग्य राहील ही मागणी लावुन धरली. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने मागील पाच वर्षा पासुन सुरू असलेल्या लढ्याला यश आले. महाराष्ट्र शासनाने दि.२८/६/२०२२ ला शासन निर्णय काढुन राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीवकाम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी दिल्या जाणा ऱ्या राज्य शिक्षक पुरस्काराला आता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव दिले आहे. सदरील निर्णयाचे डॉ. पंजाबराव देश मुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्या त येत आहे. या निर्णयामुळे शिक्षक वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.

सदरील शासन निर्णयाचे परिषदेचे संस्थापक पप्पु पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष (प्रा) लक्ष्मण नेव्हल, प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके, महासचिव सतीश काळे, महासचिव सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, राज्य समन्वयक शामराव लवांडे, शेषराव येलेकर, उपाध्यक्ष शांताराम जळते, नागपुर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, मोतीराम रहाटे, शिव ब्रिगेड चे सतीश मालेकार, प्रदिप चोरे, देवेंद्र टाले, संजय ईंगळे, सचिन भोयर, नितीन धोरण, राममूर्ती वालशिंगे, प्रा. डाॅ. लीलाधर पाटिल, डॉ. विलास पाटील, कैलाश राऊत विदर्भ प्रमुख बंडुभाऊ डाखरे, विनोद पाटील, प्रभाकर पराड, राजकिरण चव्हाण, वसंत नेरकर, किर्ती वनकर, चंद्रशेखर कोहळे, शिवशंकर स्वामी, अविता वाघमारे , के. डी. वाघ, अनंत मिटकरी, सुनिल मनवर जिल्हाध्यक्ष विनोद डाखोरे, रमेश पवार,सादिक पठाण, नरेंद्र हाडके, दत्तात्रय गावंडे, राजु उरकुडे, नितीन ठाकरे, प्रशांत जिन्नेवार, देवदत्त भोयर, ज्ञानेश्वर गायकवाड, राजकुमार भोयर, राजेंद्र गुघाणे, अखलाख सर, बाळासाहेब सरसमकर, संदिप ठाकरे, संदिप गोहोकार, विजय कदम, विजय ढाले, महादेव ढगे, आशिष खडसे, मधुकर डहाके, गिताताई बेले, पुष्पा ताई महल्ले, सुवर्णाताई डोंगरे, सुचिता मासुरकर, मिनाताई काळे आदींनी स्वागत केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खैरी गावात विवाहित महिलेचा विद्दुत धक्क्याने मृत्यु.

Sat Sep 3 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 3 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावातील कडू कुटुंवातील एक विवाहीत महिला ही आंघोळीसाठी हिटर वर पाणी गरम करून घरकामात व्यस्त असता अचानक पाणी गरम झाला की नाही हे पाहायला गेले असता दुर्दैवाने विद्दुत धक्का लागल्याने सदर विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे बारा दरम्यान घडली असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!