अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – तिरोडा पंचायत समितीच्या सभापती कुंता पटले व उपसभापती हुपराज जमईवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील सर्व गावात दि १३ ते १५ आँगस्ट या तीन दिवसाच्या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरी तिरंगा फडकविणार आहेत. त्या चित्रफीत रथाचे पुजाअर्चना करून हिरवी झेंडी दाखवून रथाचे पंचायत समिती येथून रवानगी केले. राष्ट्ध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी आपल्या घरावर तिंरगा कसा लावावा या बाबत ध्वज संहीतेची माहिती देण्यात आली. प्रत्येक नागरिकांना ध्वज संहीतेची माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने व जिल्हा परिषद गोदिंया यांच्या वतीने जनजागृती चित्रपथ तयार करून या चित्रपथाला मंगळवारी तिरोडा पंचायत समिती ला पाटविण्यात आले व चित्रपथ गाडी चे उदघाटन करून हिरवी झेंडी सभापती कुंता पटले् व उपसभापती हुपराज जमईवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवली.
पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रमात खंड विकास अधिकारी सतिश लिल्हारे,विस्तार अधिकारी मनोज बडोले, धारगावे,अनुप भावे, सितेश पटले,भायदे,कुर्वे, बैस,लेखापाल यादव, लाडंगे,बिसेन सर्व कर्मचारी उपस्थित होते. तिरंगा ध्वज बाबत माहिती देणारा हा चित्रपथ तालुक्यातील प्रत्येक गावात फिरत माहिती देणार व तसेच आपल्या घरावर झेंडा लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन करण्यासाठी घरांवर तिंरगा कसा लावावा नियम काय आहे.. याची माहिती व संहिता चे पालन कसे करावे या बद्दल व्हिडीओ च्या माध्यमातून दिली जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज राहंगडाले यानी तिरंगा चे नियम व अमुतम्होत्सव च्या सुभेच्छा संपूर्ण जिल्हा नागरिकांना दिल्या आहेत.