अमरदिप बडगे,प्रतिनिधी
– निसर्गाची किमया की चमत्कार
गोंदिया – जिल्ह्यातील मुर्री येथील परिसरात सदाफुलीच्या झाडावर नागराजाची प्रतिकृती असल्याचे व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर आज नागपंचमी निमित्त नागरीकांनी त्या झाडांची पूजा करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. या सदाफुली च्या झाडाच्या दोन फांद्यांना नागाच्या फण्यासारखी प्रतिकृती आली. असून हा चमत्कार की निसर्गाची किमया ? अशी चर्चा जनमानसात होत आहे.
आज नागपंचमी असून मोठ्या प्रमाणात लोक नाग मंदिरात जाऊन नाग देवाची पूजा अर्चना करता मात्र गोंदियात आज नागपंचमी निमित्त सदाफुली च्या झाडांवर नागराजाची प्रतिकृती दिसल्याची माहिती सोशल मीडियावर वायरल झाली होती. तो व्हिडीओ लोकांनी बघितला आणि आज नागपंचमी असल्याने लोकांनी सकाळ पासून या ठिकाणी त्या सदाफुली च्या झाडावर असलेल्या नागराजाची प्रतिकृती ची पुजा करत असुन त्या ठिकाणी त्या प्रतिकृती ला दूध देखील चढविण्यात येत आहे. तर प्रशाद व पैसे देखील मोठया प्रमाणात चढविण्यात येत आहे.