हिमोग्लोबिन तपासणी व समुपदेशन शिबिरात 175 विद्यार्थ्यांचा सहभाग

सिकलसेल आजाराची साखळी तोडता येणार – लिना तामगाडगे

‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ उपक्रम

नागपूर – विशिष्ट समुदायातील अनुवंशिक आजार अशी ओळख असलेल्या सिकलसेल आजार हा हिमोग्लोबीमुळे लाल रक्त पेशींद्वारे आकार बदलल्यानंतर होत असतो. दुर्धर असलेल्या सिकलसेलबाबत मोठयांना थोडीफार माहिती असते. परंतु, विद्यार्थ्यांना हा आजार कसा होतो आणि आजारांची लक्षणे काय असतात हे सुद्धा माहिती नसते. त्यामुळे षाळकरी मुला-मुलींना जर आजाराबाबत संपूर्ण माहिती दिल्यास तरच भविष्यात सिकलसेल आजाराची साखळी तोडण्यास मदत होणार, असे मौलिक प्रतिपादन स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे यांनी केले. ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत कुंजीलालपेठ, रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित मानवता प्राथमिक व हायस्कुल येथे गुरुवारी ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत निःशुल्क हिमोग्लोबीन तपासणी व समपूदेषन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून नव-युवक एज्युकेशन सोसायटीचे संचालक संकेत डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवता प्राथमिक व हायस्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका चारूशिला डोंगरे, मेडिनोवा पॅथोकेयरचे संजय निमजे यांची उपस्थिती होती. स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्गदर्शनात तर मेडिनोवा पॅथोकेयरच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात 8 ते 10 वर्गातील 175 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आले.पुढे बोलताना लिना तामगाडगे यावेळी म्हणाल्या की, सिकलसेलसारख्या दीर्घकालीन आजाराचे निदान लवकर झाल्यास त्यावर औषधोपचार करून नियंत्रण मिळवणे सोपे जाते. त्यामुळे सिकलसेलची तपासणी ही लवकर होणे आवश्यक असते. शाळेत जाणाऱ्या 5 ते 10 व्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना जर सिकलसेल आजार व निदानाबाबत माहिती मिळाली तर भविष्यात या हा आजार कायमचा हद्दपार होऊ शकतो, असेही लिना तामगाडगे यांनी आपल्या भावना उपस्थितांना समोर व्यक्त केले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात मानवता प्राथमिक व हायस्कूलच्या शिक्षक वृदांनी उपस्थित मान्यवरांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान केले. यानंतर विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी तसेच ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन पत्र (फार्म) भरण्यात आले.

या मागर्दशन पत्रकाद्वारे सिकलसेल रूग्णांची माहितीचे संकलन ट्रस्टद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत शेळकी यांनी तर आभार ट्रस्टचे व्यवस्थापक अमोल कांबळे यांनी मानले. निःशुल्क हिमोग्लोबीन तपासणी व समपूदेशन शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टचे जसवीर फोगट, मेडिनोवा पॅथोकेयरचे अनिकेत वारकर, हर्षा गायधने, रोहित चामट, ममता भेंडे, मानवता प्राथमिक व हायस्कूलचे शिक्षकवृंदातील दीपक गजभे, किशोर माहुरकर, भावना खांडेकर, प्रतिभा महल्ले, मंदाकिनी शेंडे, नितीन हसबंड, बारापात्रे सर, नन्नावरे सर यांचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहिती तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

श्रीकृष्ण, गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुर्तीकार सज्ज

Sat Jul 23 , 2022
अमरदिप बडगे , प्रतिनिधी  गोंदिया: – पुढील महिन्यात भगवान श्रीकृष्ण व बाप्पाचे आगमन होणार आहे. तसेच त्यांच्या मुर्ती तयार करण्याच्या कामालाही सुरूवात झाली. ठिकठिकाणी श्री कृष्ण आणि बाप्पाच्या मुर्ती बनविण्याच्या कामात मुर्तीकार व्यस्त झाले असल्याचे दिसुन येत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मुर्ती तयार करण्यासाठी महागडी मातीची खरेदी करण्यात येत असुन शहरात मुर्तीकार १० ते ५४ फुटांच्या श्री गणेषाच्या मुर्ती बनवताना दिसून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!