अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यातील त्रिभुवन भोंगाडे वय 27 वर्षे याने फेसबुक वॉल वर मारया स्टुडिओ ची जाहिरात पाहिली, त्याद्वारे ते नाईक कंपनी चे जूते रू.599/- ला विकत होते. सदर जाहिरात ही फेसबुक वर असल्यामुळे ग्राहकाने त्याचावर विश्वास ठेवला व ऑर्डर प्लेस केला आणि रू. 599/- डेबिट कार्ड द्वारे दिले, परंतु सदर मालाची (जूते) ग्राहकाला डिलिव्हरी झालीच नाही. त्यानंतर ग्राहकाने फेसबुक वर मारया स्टुडिओ कस्टमर केअर ची माहिती नसल्यामुळे गूगल वर मारया स्टुडिओ कस्टमर केअर सर्च केला व आलेल्या मोबाईल नंबर वर कॉल केल्यानंतर एका व्यक्ती ने कस्टमर केअर म्हणून ओळख दिली व रू.599/- रिफंड च्या नावावर ग्राहकाला रू. 6969/- गंडा घातला.
त्यानंतर ग्राहकाने फेसबुक ला ईमेल केला व मारया स्टुडिओ बद्दल माहिती मागितली व नुकसान भरपाई ची सुध्दा मागणी केली परंतु फेसबुक ने कसलाही रिप्लाय दिला नाही. म्हणून ग्राहकाने त्याचे वकील ॲड.सागर चव्हाण यांच्या द्वारे जिल्हा ग्राहक मंच, गोंदिया मध्ये फेसबुक विरोधात तक्रार दाखल केली.
सदर केस चा निकाल दि. 30/06/2022 ला लागला व ग्राहक मंच, गोंदिया ने फेसबुक ला दिशाभूल करणारी जाहिरात केल्याचे दोसी ठरवले व ग्राहकाला रू. 25,000/- नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच ग्राहक मंच, गोंदिया ने फेसबुक ला झालेल्या फसवणुकी बद्दल विविध प्रसार माध्यमातून जनजागृती करण्याचे आदेश दिले. सदर केस मध्ये ग्राहकाकडून ॲड. सागर चव्हाण यांनी कामकाज पाहिले.