नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डीमार्फत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सारीपुत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर तालुक्यातील मौजा पाटणसावंगी येथे ‘कृषि दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून रोशनी ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. अश्विनी गायधनी (उद्यानविद्या), मयुरी ठोंबरे (गृह विज्ञान), प्रताप साबळे, कापूस उत्पादक तज्ञ आणि तुलसीदास पाटील हे उपस्थित होते.
डॉ. अश्विनी गायधनी यांनी फळबाग व फुलबाग लागवड या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मयुरी ठोंबरे यांनी लघुउद्योग स्थापन आणि उत्पादन विक्री यावर शेतकऱ्यांना संबोधन केले. रोशन डंभारे, कृषि पर्यवेक्षक यांनी शेतकऱ्यांना विविध कृषि योजनांची माहिती दिली. प्रताप पाटील यांनी कापूस पिकातील बारकावे शेतकऱ्यांना पटवून दिले. कार्यक्रमात 38 शेतकरी उपस्थित आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे भूषण भक्ते, स्मिता सावरकर आणि कृषि विभागाचे रोशन डंभारे आणि अनिल खरपुरिये यांनी परिश्रम घेतले.
कृषि संजिवनी मोहिमेची सांगता व कृषि दिन साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com