अमरदिप बडगे
2 लाख रूपयाचा केला गांजा जप्त
गोंदिया – छत्तीसगड राज्यातून गोंदियात एका चार चाकी वाहनांमध्ये गांजा घेऊन जाणाऱ्या आरोपींना रामनगर पोलिसांनी फिल्मीस्टाईलने रस्ता अडवत १९ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला असुन ज्यांची किंमत 2 लाख रूपये आहे . दरम्यान पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहित उर्फ शुभम साखरे वय 26 वर्षे, मनोज लिल्हारे वय 36 वर्षे, दिपक साखरे वय 49 वर्षे, रा. जब्बारटोला, तर सनतलाल लिल्हारे वय 36 वर्षे, हा जिल्हा बालाघाट, मध्यप्रदेश यांचा समावेश आहे.