संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
-अज्ञात आरोपी विरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
कामठी ता प्र 18 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी- कळमना मार्गावरील फसवणूक करुन कॅनरा बँक रनाळा शाखेतून पेटीएम आय एम पीस प्रणालीद्वारे 4 लाख 17 हजार 799 रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञात आरोपी विरोधात नवीन कामठी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुसरत हमीद तुरक वय 42 राहणार भरत टावून न्यूयेरखेडा कामठी यांचे कॅनरा बँक रणाला शाखेत अकाऊंट असून आरोपी मोबाईल क्रमांक 63920 2 6414 89 या मोबाईल वरून दिनांक 23 मे 2022 ला दुपारी अकरा पंचेचाळीस वाजता सुमारास मोबाईल वरून फोन करून कॅनरा बँक रनाळा येथील शाखेत आपल्या खात्यात अकाउंट सोबत रजिस्ट्रेशन नोंदणी करवायाचे असल्याचे सांगून आरोपीने संगणक प्रणाली चा वापर करून खात्यातून 4 लाख 17 हजार 799 रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून तरुणाची फसवणूक केली आहे नुसरत हमीद तूरक हे कॅनरा बँक रनाळा शाखेत जाऊन पाहणी केली असता त्यांच्या खात्यातून 4 लाख 17 हजार 799 रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून 18 जून 2022 चे रात्री आठ वाजता सुमारास मोबाईल क्रमांक 639202641489 आरोपी विरोधात नवीन कामठी पोलिसांनी कलम 420 भादवि कलम 66 आयटी अयाक्ट नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे