संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र : वृक्ष लागवड ही काळाची गरज झाली असून पर्यावरणाच्या संतुलनासाठी व पर्यावसरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा व झाडे जगवा यावर भर दिला जातो तसेच दरवर्षी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्चीला जातो मात्र कामठी नगर परिषद हद्दीतील जुने प्रभाग क्र 14 येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावलेली झाडे हे नागरिकांना नैसर्गिक ऑक्सिजन देऊन नवसंजीवनी देत आहेत तर हे झाडे जगविण्याचे कार्य परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक मनोहर गणवीर यांनी निस्वार्थ पनेकेले आहे.तरीसुद्धा प्रशासनाने यांच्या कार्याची दखल घेतलो नाही ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.
हे ज्येष्ठ समाजसेवक मनोहर गणवीर यांनी रेल्वेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर उर्वरित जीवन हे समाजसेवेसाठी अर्पण केल्याचा निर्धार केला. या निश्चय संकल्पनेतून स्वखर्चातून भव्य मोठे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारले . या प्रवेशद्वाराच्या कडेला असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पटांगगणच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने विविध प्रजातीचे 20 च्या वर रोपटे लावून त्यांची स्वमेहनतीतून स्वयंसेवा करीत दररोज या रोपट्याना पाणी देऊन जोपासना करीत रोपट्याचे आज वृक्षात रूपांतर केले. आज या वृक्षाच्या खाली बसून नागरिक विसावा घेतात. तर याच परिसरात असलेल्या यशोधरा बुद्ध विहारात सुद्धा धम्मसेवा करीत आहेत तसेच लोकवर्गणीतून कार्यान्वित असलेल्या निर्वाण रथाची जवाबदारी सुद्धा योग्यरीत्या सांभाळत असून देहावसान झालेल्या मृतकाना मोक्षधाम घाटावर पोहोचविण्याचे कार्य सुद्धा प्रमाणिकतेने करीत आहेत.या समाज सेवेच्या माध्यमातून वृक्षाचे संगोपन करणाऱ्या समाजसेवक मनोहर गणवीर यांची अजूनपावेतो प्रशासनाने दखल घेतली नसल्याने पर्यावरण प्रेमी तरुणांमध्ये प्रशासनसविरोधात नाराजगीचा सूर वाहत आहे.
मागील कोरोनाच्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण झाला होता .लाखो रुपये खर्च करूनही ऑक्सिजन मिळेना अशावेळी नागरिकांना नैसर्गिक ऑक्सिजन चे महत्व कळले होते. एकीकडे वृक्षारोपणकडे नागरिकांनी कल वाढवावा यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून जोर देत मोठ्या प्रमाणात निधी खर्चीला जातो बहुधा वृक्षारोपण हे कागदावर तर देखावा म्हणून केल्याचे वास्तव आहे.मात्र ज्येष्ठ समाजसेवक मनोहर गणवीर यांनी स्वखर्च व समाजसेवाची भावना मनात दृढ धरत स्वता मेहनत घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे जगवली. जे या मैदानाला शोभून दिसत असून नागरिकांसाठी विसावा सह ऑक्सिजनची नवसंजीवनी ठरत आहेत.त्याच्या या निस्वार्थपने केलेल्या या कार्याची प्रशासन दखल घेईल काय?असा प्रश्न येथील नागरिकांना पडला असून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या वैभवात भर घालणाऱ्या व नैसर्गिक ऑक्सिजन देणाऱ्या या वृक्षाचे जतन करणाऱ्या मनोहर गणवीर यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे.तर प्रत्येक नागरिकांनी घरासमोर व जेथे शक्य होईल तेथे एक तरी झाड लावावे असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक मनोहर गणवीर यांनी केले आहे