कैद्याबाबत लेखी निवेदन 25 जून पर्यंत सादर करावे

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील 3 कैद्यांचा मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे झालेला असून मृत्युबाबतची दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय दंडाधिकारी नागपूर शहर यांचे मार्फत करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत.
घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छुकांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसील कार्यालय, नागपूर शहर येथील खोली क्र. 1 मधील कार्यालयात 25 जून 2022 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करावे, असे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी कळविले आहे.
कैद्याचे मृत्युबाबत त्या घटनेची कारणे व परिस्थिती, मृतकाच्या मृत्युस कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणे जसे शासन यंत्रणेकडून झालेली दिरंगाई व दाखल करण्यात आलेले खोटे अहवाल याबाबींवर उपविभागीय दंडाधिकारी चौकशी करणार आहेत.
मृत कैद्यांची नावे या प्रमाणे आहेत. नरेंद्र राजेश वाहाने वय 39, राहणार प्लाट नं. 209, आदिवासी सोसायटी फरस चौक झिंगाबाई टाकळी, नागपूर यांचा मृत्युचा दिनांक 11 मार्च 2022. दुर्गेश ऊर्फ छल्ला धृपसिंग चौधरी वय 31 वर्ष, राहणार रेणूकानगर, गंगाबाग,पारडी नागपूर, यांचा मुत्युचा दिनांक 26 फेब्रुवारी 2022. सोनु ऊर्फ सोहेल साहेबखॉन बाबुखाँन वय 27 वर्ष राहणार मौलाना मस्जिदजवळ, ताजबाग, नागपूर, यांचा मृत्युचा दिनांक 28 फेब्रुवारी 2022 असे आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गुटखा, पानमसाला,सुगंधीत तंबाखुचा साठा जप्त

Thu Jun 9 , 2022
– एकुण 73 लाख 49 हजार सडक्या व भेसळयुक्त सुपारीचा तर 2 लाख 65 हजार किमतीचा मुदेमाल जप्त  नागपूर : संशयित सडक्या, भेसळयुक्त सुपारीचा 73 लाख 49 हजार 499 रुपये किंमतीचा साठा तसेच गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा 2 लाख 65 हजार 420 रुपये किंमतीचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध माध्यमामार्फत एप्रिल व मे महिन्यात अनेक ठिकाणी धाडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!