गुटखा, पानमसाला,सुगंधीत तंबाखुचा साठा जप्त

– एकुण 73 लाख 49 हजार सडक्या व भेसळयुक्त सुपारीचा तर 2 लाख 65 हजार किमतीचा मुदेमाल जप्त 

नागपूर : संशयित सडक्या, भेसळयुक्त सुपारीचा 73 लाख 49 हजार 499 रुपये किंमतीचा साठा तसेच गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा 2 लाख 65 हजार 420 रुपये किंमतीचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध माध्यमामार्फत एप्रिल व मे महिन्यात अनेक ठिकाणी धाडी टाकून जप्त केला आहे.
73 लाख 49 हजार 499 हजार रुपये किमंतीच्या साठ्यामध्ये उमेर ट्रेडिंग कंपनी शांतीनगर, नागपूर यांचा 38 लाख 40 हजार 700 रुपये किंमतीचा 9 हजार 594 किलोगॅम साठा, मे. क्वॉलिटी ट्रेडर्स कळमना नागपूर यांचा 20 लाख 59 हजार 800 रुपये किंमतीचा 9 हजार 464 किलोगॅम साठा, मे. गुरु ट्रेडर्स मस्कासाथ, इतवारी, नागपूर यांचा 6 लाख 61 हजार59 रुपये किंमतीचा 2 हजार 998 किलोगॅम साठा तर मे. ज्योती गृह उद्योग, न्यु सूरज नगर, रिंग रोड, वाठोडा नागपूर 7 लाख 87 हजार 940 हजार किंमतीचा 2 हजार 768 किलोगॅम साठा जप्त करण्यात आला आहे.
त्यासोबतच प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखु यांचा 2 लाख 65 हजार 420 रुपये किंमतीचा साठा जप्त करुन पोलीस स्टेशन भादवि कलम व अन्न सुरक्षा अधिकार व मानदे कायदा 2006 च्या कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे.
यामध्ये नितीन कन्हैय्यालाल थारवानी नागपूर 42 हजार 930 रुपये किंमतीचा 31.8 किलोगॅम साठा, मोहम्मद साजिद मोहम्मद ईस्माईल नागपूर 5 हजार 970 रुपये किंमतीचा 5.97 किलोग्रॅम साठा, मोहम्मद रिजवान मोहम्मद शाकीब अंसारी नागपूर यांचा 1 लाख 1 हजार 830 रुपये किंमतीचा 119.8 किलोगॅम साठा, वजरंग रामलाल शाहू, जयवंत नगर नागपूर यांचा 46 हजार 576 रुपये किंमतीचा 64.9 किलोगॅम साठा, अब्दुल रशिद अब्दुल जब्बार मोमिनपूरा नागपूर यांचा 41 हजार 684 रुपये किंमतीचा 45.96 किलोगॅम साठा, पिंकल चुन्नीभाई पटेल, वार्ड क्र.5, सावनेर यांचा 5 हजार 164 रुपये किंमतीचा 3.52 किलोगॅम साठा तर वकारुद्दीन वजाऊदीन सिध्दीकी, ताज नगर नागपूर यांचा 21 हजार 266 रुपये किंमतीचा 29.13 किलोगॅम साठ्याचा समावेश आहे.
अन्न पदार्थ जप्त करुन अन्न नमूने अन्न विश्लेषकांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून प्रतिबंधित अन्न पदार्थांचे विक्रेत्यांना पोलीसाकडून अटक करण्यात आली आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानूसार कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे.
ही कारवाई नागपूर विभागाचे सह आयुक्त(अन्न) सु. गं. अन्नपुरे व सहाय्यक आयुक्त प्रशांत देशमुख याच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकारी पी. व्ही. मानवतकर, व्हि. पी. धवङ अ.अ. उपलप, एस. व्ही. वाभरे व अ. ए. चौधरी यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भालेराव महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

Thu Jun 9 , 2022
सावनेर – स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक जैवविविधता दिन – २०२२ आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष या निमित्याने महाराष्ट्र राज्य स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भूतलावरील जैवविविधता, महत्व आणि त्याच्या संरक्षण विषयी जागृती निर्माण व्हावी या विशेष हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन विभागप्रमुख आणि उपक्रम समन्वयक प्रा. डॉ. विलास डोईफोडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!