नागपूर :-फिर्यादी बबनराव सिताराम मगरदे, वय ६२ वर्ष, रा. प्लॉट नं. ४०, कुकडे ले-आउट, अजनी, नागपूर हे त्यांचे मोपेड गाडीने दिघोरी ते उमरेड रोड दरम्यान, टेलिफोन नगर, चौकातून पुढे जात असतांना, दोन अनोळखी ईसमांनी मोटरसायकलवर येवुन फिर्यादीचे पायाजवळ ठेवलेली रोख ३ लाख रूपये असलेली बॅग जबरीने हिसकावुन पळून गेले. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०९ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून त्यांनी केडीके कॉलेज रोड परिसरात सापळा रचुन शाईन मोटरसायकल व अपाचे मोटरसायकलवर बसुन असलेले आरोपी क. १) वासुदेव मोहनलाल नट, वय ४५ वर्ष, २) सोमकुमार शिवप्रसाद नट, वय ३५ वर्ष ३) धर्मेन्द्र मोहनलाल मिना, वय ४० वर्ष तिन्ही रा. झक्करपूर, पोस्ट गाला, ता. पत्वलगाव, जि. जसपुर छत्तीसगढ़ ४) सावनकुमार नेहरूलाल नट, वय २९ वर्ष रा. दिवानपुर, पोस्ट दिवानपुर, ता. पत्थलगाव, जि. जसपुर छत्तीसगढ यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्यांनी संगणमत करून वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना अधिक विचारपुस केली असता, त्यांनी वरील गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत जबरी चोरीचा प्रयत्न केल्याची, तसेच पोलीस ठाणे सावनेर नागपूर ग्रामीण हद्दीत एक चोरीचा गुन्हा हद्दीत केल्याची कबुली दिली. तसेच आरोपी क. १ याने त्यास साचिदार पोहिजे आरोपी क. ५) आकाश रोशनलाल नट, रा. झक्करपूर, पोस्ट गाला, ता. पत्थलगाव, जि. जसपूर छत्तीसगड याचे सोबत संगणमत करून छत्तीसगड येथील पोलीस ठाणे लखनपुर व पत्थलगाव येथे दोन वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे सांगीतले. आरोपींचे ताब्यातुन वेग-वेगळया कंपनीचे ०४ मोबाईल फोन, दोन मोटरसायकल, दोन हेलमेट व रोख ३,१८,०००/- रू. असा एकुण किंमती अंदाजे ४,८३,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता वाठोडा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि, कमलाकर गड्डीमे, पोउपनि. वैभव बारंरी, पोहवा. युवानंद कडु, नाजीर शेख, पुरुषोत्तम जगनाडे, अभिषेक शनिवारे, अतुल चाटे, अजय यादव, रोशन तिवारी, पुरुषोत्तम काळमेघ, महेन्द्र करींगवार, नरेन्द्र यति पोअं, लक्ष्मण कळमकर यांनी केली.