संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या महालगाव येथील खसरा नं 274 या शासकीय जागा असून खसरा क्र 273 ही महेश शंकर झाडे यांच्या नावाच्या मालकी हक्काची असून यांच्या शेतीला लागून असलेल्या खसरा क्र 274 या शासकीय जागेवर अतिक्रमनकाऱ्याने कब्जा केलेला आहे तसेच सरकारी खसरा नं 8, 28, 15 या जागेवर अतिक्रमण करून खसरा क्र 7 या जागेवर गोडाऊन निर्माण केले आहे.तेव्हा सदर शासकीय जागेवरील अतिक्रमण काढून शासकीय जागा स्वतःच्या ताब्यात घेत यातील दोषी व्यक्तीवर तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाही करण्याच्या मागणीसाठी शिवसेना च्या महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना नागपूर जिल्हाअध्यक्ष राजन सिंग यांच्या नेतृत्वात तहसीलदार ला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन देताना तालुका प्रमुख समीर सोनारे, गणेश सायरे, सचिन नरवाडे आदी उपस्थित होते.
महालगावच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनाचे सामूहिक निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com