98 वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पहिल्या गृह मतदार

भंडारा :- चुनाव का पर्व, देश का गर्व, ह्या घोषवाक्यानुसार भारतीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा- गोंदिया मतदारसंघासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने प्रथम गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. यामध्ये 85 वर्षाहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी 12 डी नमुना भरून दिला, त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया करण्यात आली.

मूळ साकोली येथे रहिवासी असणाऱ्या जैनबी जब्बार कुरेशी ह्या 98 वर्षाच्या असून आजारामुळे त्या अंथरुणाला खिळून आहेत. अनेक वर्ष झाले त्यांनी मतदानामध्ये सक्रिय मतदान केले नव्हते. कारण मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्यांना आधार घेत जावे लागत होते. त्यामुळे मौल्यवान मताधिकारापासून त्या वंचित राहत होत्या, मात्र आयोगाने गृह मतदान सुविधा उपलब्ध करून दिल्याने या लोकसभा निवडणुकीसाठी जैनबी जब्बार कुरेशी यांनी मतदान केले.

दोन मुलं आणि दोन मुली असलेल्या जैनबी यांच्या कुटुंबांमध्ये त्यांचे पुत्र कलीम जब्बार कुरेशी यांनी गृह मतदान प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच मतदान प्रक्रिया गोपनीयतेने पार पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये गृह मतदानाची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पहिल्या दोन दिवसात 1243 मतदारांनी मताधिकार बजावला. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ 7 एप्रिल रोजी करण्यात आला.

जैनुब्बी यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले.

मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये जैनबी यांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली. ही मतदान प्रक्रिया नागेश बी. तईकर सुक्ष्म निरिक्षक (Micro Observer), टि.टि. झंझाड मतदान केंद्राध्यक्ष, एस.एन. परकवार मतदान अधिकारी, अनिल राऊत पोलीस कर्मचारी, नितेश वाढवे व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत पार पडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देश के व्यापारियों का चेहरा प्रवीण खंडेलवाल के संपर्क कार्यालय का उद्घाटन

Thu Apr 11 , 2024
नागपूर :-आगामी लोकसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व के द्वारा दिल्ली के चांदनी चौक लोकसभा क्षेत्र से देश भर के व्यापारियों का चहरा प्रवीण खंडेलवाल को प्रत्याशी बनानेके लिए कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स के राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पार्टी अध्यक्ष  जेपी नड्डा और गृह मंत्री अमित शाह का आभार माना। भरतिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com