सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 95 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई   

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. 10) रोजी उपद्रव शोध पथकाने 95 प्रकरणांची नोंद करून 56 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 9 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद करून 3 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 22 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून 5 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

हनुमाननगर झोन अंतर्गत अष्टविनायक बिल्डर एकमत नगर मानेवाडा आणि मंगळवारी झोन अंतर्गत खेमानी इन्फ्रा कस्तुरबा नगर जरिपटका रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 02 प्रकरणांची नोंद करून 20 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर परिषदची जन्म मृत्यू नोंद वेबसाईट संथगतीने

Thu Jul 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील बहिणींना गोडभेट म्हणून महायुती शासनाने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना अंमलात आणली.आणि ती योजना जाहिर होताच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची झुंबड उडत असताना कामठी नगर पालिकेची जन्म मृत्यू नोंद 1 जुलै पासून अतिशय संथगतीने सुरू असून कधीकधी तर दिवसभर वेबसाईट बंद असते याप्रकारची तांत्रिक अडचण असल्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com