सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 85 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई   

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. 12) रोजी उपद्रव शोध पथकाने 85 प्रकरणांची नोंद करून 97 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 1 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद करून 12 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 60 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन 2 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 37 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 01 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवारी (ता. 12) रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपूरा झोन अंतर्गत योगेश किरणा शॉप अनाज बाजार ईतवारी यांच्याकडून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत स्वरनिमा खरे काच्चीपूरा रामदासपेठ आणि धंतोली झोन अंतर्गत आर्या साई बिल्डकॉन नवीन जानकी नगर बालाजी नगर रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत ओरल मॅक्सी फोरल डेन्टील क्लिनिक बेसा पावर हाऊस माहाकाली हुडकेश्वर आणि गांधीबाग झोन अंतर्गत मेट्रोपोलिक हेल्थ केयर संदेश देवा बाजार सीए रोड वैद्यकीय कचरा रस्त्याच्या कडेला टाकणेबाबत या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत फेजल खान संत्रा मार्केट कचरा रस्त्यालगत टाकणेबाबत यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 06 प्रकरणांची नोंद करून 90 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला काँग्रेस करणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Sat Jul 13 , 2024
नागपूर :- रविवार दि. १४ जुलै २०२४ रोजी खोत सभागृह,महाल येथे नागपूर शहर महिला काँग्रेस वतीने खोत सभागृह , महाल नागपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे आयोजक ऍड. नंदा चंद्रभान पराते आहेत. या सत्कारात माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल व प्रमुख पाहुणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com