कामठी तालुक्यातील चार अंगणवाडी केंद्रात 8 लक्ष रुपयांचा साहित्य घोटाळा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- अंगणवाडी श्रेणीवर्धन योजने अंतर्गत साहित्य पुरवठा करण्यासाठी कामठी तालुक्यातील अंगणवाड्याना प्राप्त निधीतून कामठी तालुक्यातील चार अंगणवाडी केंद्रात 8 लक्ष रूपयाचा साहित्य घोटाळा झाला असून यासंदर्भात कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांनी कामठी पंचायत समितीचे सिडीपीओ विरुद्ध नविन कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली आहे.

अंगणवाडी श्रेणीवर्धन योजने अंतर्गत अंगणवाडयाना साहित्याचा पुरवठा करण्यासाठी मार्च 2024 मध्ये कामठी तालुक्यातील येरखेडा, गादा,येरखेडा, व पोवारी या चार गावातील अंगणवाडी केंद्रात प्रत्येकी 2 लक्ष रुपये प्रमाणे 8 लक्ष रूपयाचा साहित्य पुरवठा करण्यात आला मात्र हे साहित्य पुरवठा बाजार भाव मूल्यपेक्षा अधिक किमतीने खरेदी विक्री केली असून या व्यवहारात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करीत बीडीओ प्रदीप गायगोले ने तत्कालीन सेवानिवृत्त सिडीपीओ रवींद्र चव्हाण विरुद्ध कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली असून पुढील तपास सुरू आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येरखेड्यात इसमाचा आकस्मिक मृत्यू

Mon Jun 3 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील तेलिपुरा भागातील रहिवासी एका इसमाचा राहत्या घरात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी 5 दरम्यान निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव नंदेश गोपीचंद वाघमारे वय 45 वर्षे रा येरखेडा कामठी असे आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com