संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
विधानसभा स्तरीय मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची बैठक घेवून मंजूर केले अर्ज
कामठी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत कामठी विधानसभा क्षेत्रा अंतर्गत 79,996 अर्ज मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कामठी विधानसभा क्षेत्राची बैठक समितीचे अध्यक्ष आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तहसिल कार्यालय नागपूर ग्रामिण येथे पार पडली.
कामठी, मौदा व नागपूर ग्रा तालुका व शहरी येथुन अर्ज प्राप्त झाले होते त्यामधुन 79,996 अर्जांना आज मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे त्यात कामठी तालुका 34,887 अर्ज, मौदा तालुका 21,792 अर्ज व नागपुर ग्रा. तालुका 23,317 असे एकुण 79,996 अर्ज पात्र ठरले व उर्वरीत अर्जाची त्रृटी पुर्तता केल्यानंतर ते मंजूर करण्यात येतील.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमीका मजबुत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन आमदार सावरकर यांनी केले.
बैठकित नागपूर ग्रामिण तहसिलदार बाबासाहेब टेळे,कामठी तहसिलदार गणेश जगदाळे, मौदा तहसिलदार धनंजय देशमुख, मुख्याधिकारी मौदा धाबर्डे, मुख्याधिकारी कामठी बिडगाव संदीप बोरकर, मुख्याधिकारी महादुला अमर हांडा, गटविकास अधिकारी मौदा झिंगरे, गटविकास अधिकारी कामठी/नागपूर ग्रामिण भागवत, महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी, शासकिय अधिकारी उपस्थित होते.