सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ७७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ७७३ निकाली ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई :- राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ७७६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ७७३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक - जॉन मार्क सेर शार्ले

Mon Oct 21 , 2024
– फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध असल्याची माहिती मुंबई :- आता फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक असून आज फ्रान्स येथील विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून राबविले जातात. फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही, असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी आज येथे केले. वाणिज्यदूत सेरे शार्ले यांनी सोमवारी (दि. २१) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com