कामठी बस स्टँड चौकातून 750 ग्राम गांजा जप्त 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 5 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकात एका तरुणाजवळ गांजा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून सदर तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 750 ग्राम किमती 7 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला तसेच एक मोबाईल किमती 1 हजार रुपये व गांजा विक्रीचे नगदी 515 रुपये असा एकूण 9 हजार 15 रुपये चा मुद्देमाल जप्त करीत आरोपी विरुद्ध भादवी कलम 20 एनडीपीएस ऍक्ट 1985 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्याची कारवाही गतरात्री 2 वाजता केली असून अटक आरोपीचे नाव फैजान खान वसीम खान वय 23 वर्षे रा फुटाना ओली कामठी असे आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घड्याळ्याचे काटे फिरले उलटे! 36 लाखांचे काम अवघ्या पावणे 2 लाखांत 

Thu Jan 5 , 2023
नागपूर (Nagpur) : तब्बल ३६ लाखांचे काम अवघ्या पावणे दोन लाखांत कोण करणार, असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. आवळा दाखवून भोपळा काढण्याचा हा प्रकार असावा, अशी शंकाही येऊ शकते. मात्र नागपूर महापालिकेने (NMC) काढलेल्या क्लॉक टॉवरच्या टेंडरचे (Clock Tower Tender) काटे उलटे फिरले. एचएमटी (HMT) कंपनीने हे काम अवघ्या पावणे दोन लाखात करण्याची तयारी दर्शवली आहे. क्लॉक टॉवर व परिसराचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com