कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचे 75 टक्के मतदान शांततेत..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-68 हजार 185 मतदारांपैकी 50 हजार 689 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

कामठी ता प्र 19 :- काल 18 डिसेंबर ला सकाळी साडे सात ते सायंकाळी 5.30वाजेपर्यंत कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच सदस्यपदाच्या निवडणूक मतदानात एकूण 68 हजार 185 मतदारांपैकी 50 हजार 689 मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावला.यानुसार निवडणूक अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात झालेल्या 27 ग्रामपंचायत निवडणूक मतदानाची टक्केवारी ही 75.3टक्के झाली असून उद्या 20 डिसेंबर ला कामठी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून या मतमोजणीतून निवडणूक रिंगणात असलेल्या सरपंच पदाच्या 90 तर सदस्य पदाच्या 620 सदस्यापैकी सरपंच पदासाठी 27 तर 93 प्रभागातील 247 सदस्यांची निवड होणार आहे.त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारात धाकधुकी वाढली असली तरी मतमोजणीतून निकाल जाहीर होणार असला तरी या मतमोजणी निकालातून कुणाचे भाग्य उजळते हे दिसणार आहे.

काल 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचे थेट जनतेतून सरपंच पदासाठी 90 उमेदवार तर 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात होते .122 मतदान केंद्रावर शांततेत झालेल्या मतदानानुसार नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत मध्ये 1390 मतदारांपैकी 1221 मतदान झाले तर रणाळा गावातील 5111 मतदारापैकी 3584 मतदार,खापा गावातील 1390 मतदारांपैकी 1221 मतदार,गुमथी गावातून 672 मतदारांपैकी 602 मतदार,सुरादेवी गावातील 1388 मतदारांपैकी 1185 मतदार,बिना गावातील 2742 मतदारांपैकी 2222 मतदार, खैरी गावातील 1935 मतदारांपैकी 1395 मतदार,खसाळा गावातील 1035 मतदारापैकी 944 मतदार,भीलगाव गावातील 6302 मतदारांपैकी 4254 मतदार,आजनी गावातील 2260 मतदारांपैकी 1791 मतदार,गादा गावातील 1374 मतदारांपैकी 1239 मतदार,सोनेगाव गावातील 1566 मतदारांपैकी 1318 मतदार,आवंढी गावातील 816 मतदारांपैकी 701 मतदार,भोवरी गावातील 1043 मतदारांपैकी 895 मतदार,गुमथळा गावातील 2708 मतदारांपैकी 2426 मतदार,वडोदा गावातील 4703 मतदारांपैकी 3602 मतदार,जाखेगाव गावातील 766 मतदारांपैकी 713 मतदार,भुगाव गावातील 3496 मतदारांपैकी 2835 मतदार, शिवणी गावातील 687 मतदारांपैकी 608 मतदार,आडका गावातील 822 मतदारांपैकी 726 मतदार,केम गावातील 656 मतदारांपैकी 538 मतदार,दिघोरी गावातील 1221 मतदारांपैकी 1025 मतदार,परसाळ गावातील 1333 मतदारांपैकी 1084 मतदार,कढोली गावातील 1545 मतदारांपैकी 1378 मतदार,तरोडी बु गावातील 1387 मतदारांपैकी 1152 मतदार,कापसी बु गावातील 2716 मतदारांपैकी 2208 मतदार,तसेच लिहिगाव गावातील 1026 मतदारांपैकी 929 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यानुसार एकूण 68 हजार 185 मतदारातून 50 हजार 689 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ज्यामध्ये 26 हजार 93 पुरुष मतदार तर 24 हजार 596 स्त्री मतदारांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

''प्रशासन गांव की ओर''

Mon Dec 19 , 2022
न्यू दिल्ली – दिल्ली में सुशासन सप्ताह 2022 का आयोजन विज्ञान भवन में 19—25 दिसम्बर 2022 को किया जा रहा है। ”प्रशासन गांव की ओर” थीम पर आधारित इस आयोजन में डाक विभाग द्वारा स्पेशल कैंपेन 2.0 की झलकियां डिजिटल वॉल के माध्यम से प्रस्तुत की जायेंगी।   Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!