नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (2) रोजी शोध पथकाने 74 प्रकरणांची नोंद करून 55500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10800 रुपयांची वसुली करण्यात आली.कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 2400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वै्द्यकिय व्यवसायीकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकल्याबाबत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून रु 2400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून रु 8000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 74 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com