सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 72 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. 23) रोजी उपद्रव शोध पथकाने 72 प्रकरणांची नोंद करून 50 हजार 200 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 4400 रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 23 हजार रुपयांची वसुली करण्यात आली वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करुन 1 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.

सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलाबा/टाकावू कचरा टाकणे प्रथम अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 08 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता: 23) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या कृष्णा स्विट मार्ट ईतवारी आणि बालाजी इंटरप्राईजेस ०२ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहीत्य पसरविणे या अंतर्गत धरमपेठ झोन येथील स्वासतिक डेव्लपर्स गोकुलपेठ, धंतोली झोन अंतर्गत शिव सार्थक फ्लेट स्कीम द्वारकापुरी 20 हजार रुपये दंड वसूल केला. फुटपाथवर अतिक्रमण केल्याबाबत मोहन अग्रवाल अमरावती रोड यांच्यावर कार्रवाई करुन 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत एम.ए.पी. अकेडमी आफ साईंस फेक्टरी चौक बोरगांव परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण ०६ प्रकरणाची नोंद करून ४० हजार दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रगट भए हनुमान... प्राचीन श्री शिव मंदिर में हनुमान जन्मोत्सव मनाया

Wed Apr 24 , 2024
नागपुर :- दक्षिण पूर्व मध्य रेलवे कॉलोनी, बेलिशॉप मोतीबाग नागपुर स्थित प्राचीन श्री शिव मंदिर परिसर में स्थित जागृत हनुमान मंदिर में हनुमान जन्मोत्सव बड़ी धूम धाम से मनाया गया। सुबह हनुमानजी का प्रगट उत्सव पूजन कर किया गया। तत्पश्चात पंचोपचार पूजा कर पी. विजयकुमार द्वारा सपत्नीक अभिषेक, पूजन किया गया। 108 बार हनुमान चालीसा का पाठ किया गया। उसी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!