७ दिवसात खड्डे बुजविण्याचे आवाहन ; जर का नाही बुजविले तर रस्त्यावरच तीव्र आंदोलनाचा इशारा.

नागपूर – रिंग रोड वाठोडा जुनी वस्ती नागपूर येथील प्रभाग क्र. 26 मधील नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांची भीती निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर महासचिव रुपेश बांगडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यास विभागीय अधिकारी (पूर्व ) यांना निवेदन देण्यात आले. एकच निवेदन दिले नाही तर वारंवार निवेदन दिले परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने दोन्ही विभागास निवेदन देऊन सात दिवसात खड्डे बुजविण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावरील उतरून तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील दिला आहे.
यावेळी महासचिव रुपेश बांगडे, नथुजी दारोटे, शंकर बनारसे, प्रशांत अग्रवाल, पवन गावंडे, राजेश राजगिरे, राजेश मेंढे, प्रमोद आंबाडकर आणि बरेच कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मुख्य रस्ते, गोल बाजार, गंज मार्केट रात्रीच स्वच्छ करा 

Fri Jan 7 , 2022
– आयुक्त विपीन पालीवाल यांचे स्वच्छता निरीक्षकांना निर्देश चंद्रपूर, ता. ७ : शहरातील प्रत्येक रस्ता, गल्ली आणि बाजारपेठेसह मुख्य मार्गावरील रस्ते वेळच्या वेळी स्वच्छ करण्यात यावेत. गांधी चौक ते जटपुरा गेट, गोल बाजार, गंज मार्केटमध्ये रात्रीच्या वेळीच स्वच्छता करून सदर कचरा रात्रीच उचलण्यात यावा, अश्या सूचना मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक यांना दिल्या. महापौर राखी कंचर्लावार यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!