नागपूर :- विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती मिटवण्यासाठी उर्जा ब्रेन ॲरीथमेटीक ने 6 व्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे आयोजन रायल माँ गंगा सेलिब्रेशन नागपूर येथे दि. 19 जानेवारी रोजी अबॅकस स्पर्धेचे आयोजन केले होते आणि बक्षीस वितरण 20 जानेवारी रोजी करण्यात आले. संपूर्ण भारतातून या स्पर्धेत 1300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी 6 मिनिटांत 70 गणिते सोडवली. या स्पर्धेत 300 हून अधिक पुरस्कार, 1300 पदके, रोख पारितोषिके आणि चॅम्पियन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ऊर्जा अबॅकस तर्फे 100 पेक्षा जास्त महिला शिक्षिकांना सन्मानित करण्यात आले. अबॅकस स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. संजय भेंडे (चेअरमन, नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड), अध्यक्ष मोहन नाहतकर (एम.पी. एज्युकेशन सोसायटीचे सचिव) अतिथी अर्चना नाहतकर, विवेक नाहतकर, स्मिता नाहतकर आणि जान्हवी ठेमदेव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे श्रेय आयोजक रोशन काळे आणि हितेश आदमने यांना देण्यात आले.